AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाइन अन्न मागवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! स्विगी इन्स्टामार्टवर FSSAIचा मोठा दणका

ऑनलाइन अन्न मागवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! स्विगी इन्स्टामार्टवर FSSAIचा मोठा दणका

| Updated on: Jul 12, 2026 | 10:17 AM
Share

राज्यात अन्नपदार्थांतील भेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांविरोधातील कारवाईला वेग आला असून, अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) यांनी संयुक्तपणे कठोर भूमिका घेतली आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक कारवाईनंतर आता FSSAI ने ऑनलाइन क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘स्विगी इन्स्टामार्ट’ला तब्बल ९ कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकांकडून वारंवार आलेल्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. मुदत संपलेली अंडी, सडलेले अन्नपदार्थ, दुर्गंधीयुक्त व्हे प्रोटीन तसेच लहान मुलांसाठी असुरक्षित दूधजन्य खाद्यपदार्थ ग्राहकांना पुरवण्यात आल्याचे आरोप नोटिशीत नमूद करण्यात आले आहेत.

तक्रारी असूनही कंपनीने मूळ समस्येवर उपाययोजना करण्याऐवजी ग्राहकांना केवळ रिफंड देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच, ग्राहकांनी परत केलेली निकृष्ट उत्पादने दुसऱ्या ग्राहकांना पुन्हा पाठवल्याचाही गंभीर आरोप समोर आला आहे.

या पार्श्वभूमीवर FSSAI ने स्विगी इन्स्टामार्टकडून लेखी स्पष्टीकरण, आवश्यक कागदपत्रे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित राज्यांच्या अन्न व औषध प्रशासनामार्फत नमुने गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून आयएएस तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर भेसळीच्या हॉटस्पॉटवर सातत्याने कारवाया सुरू आहेत. विविध ठिकाणांहून भेसळयुक्त अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, या कारवाईनंतर आता FSSAI च्या नोटिसांमुळे अन्न व्यवसाय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील काळात आणखी कोणत्या कंपन्यांवर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 12, 2026 10:12 AM

Follow Us