Ganesh Chaturthi 2023 | यंदा पैठणीचे वस्त्र परिधान केलेले आकर्षक बाप्पा नाशिकमध्ये दाखल
VIDEO | नाशिकमधील येवल्यात गांधी मैदान येथील बाप्पा आर्ट्स येथील कारागिराने गणपतीला पैठणीच्या वस्त्राने तयार केलेला पितांबर, शेला व फेटा परिधान करून सजवले, भक्तांना आता वस्त्र परिधान केलेल्या मूर्ती मिळणार
नाशिक, १६ सप्टेंबर २०२३ | अवघ्या काहीच दिवसांवर आपल्या लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन होणार आहे. आतापासूनच सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. तर यंदा गणेशोत्सव सणासाठी बाजारात भाविकांना काहीतरी वेगळेपण देण्यासाठी गणेश मूर्ती कलाकार नाविन्यपूर्ण कल्पना लढवताना दिसत आहे. अशातच नाशिक आणि येवल्यात यंदा पैठणीचे वस्त्र परिधान केलेले गणेश मूर्ती दाखल झाल्या आहेत. गणपती उत्सवाची लगबग बघण्यास मिळत असून येवल्यात गांधी मैदान येथील बाप्पा आर्ट्स येथील कारागिराने गणपतीला अक्षरशः यावेळी जगप्रसिद्ध असलेल्या पैठणीच्या वस्त्राने तयार केलेला पितांबर, शेला व फेटा परिधान असलेले गणपती बाजारात विक्रीस दाखल झाले आहे. यावेळी येथील गणपतीची शंकराच्या रूपातील मूर्तीला वाघांबरी वस्त्र देखील परिधान केलेले आहे. गणेश भक्तांना आता वस्त्र परिधान केलेल्या मूर्ती देखील मिळणार असल्याने उत्साहामध्ये अजूनच भर पडणार आहे.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

