Ganeshotsav 2022: शाडू मातीच्या गणेश मूर्तीला ग्राहकांची पसंती, पर्यावरणाबाबत अनेकांची सजगता
Ganeshotsav 2022 Shadu Clay Ganesha Idols Favored by Consumers Environmental Awareness
अवघ्या तीन दिवसांवर गणेशोत्सव आलेला आहे. मूर्तिकारांनी गणेशाच्या मूर्ती विक्रीसाठी सज्ज केल्या आहेत. बाजारात अनेक ठिकाणी गणेश मूर्तीचे हंगामी दुकान थाटलेले दिसत असून मूर्ती खरेदीसाठी तसेच बुकिंगसाठी ग्राहकांचीदेखील गर्दी होत आहे. यंदा शाडूच्या गणेश मूर्तीला मोठी मागणी असल्याचं मूर्ती विक्रेत्यांचं म्हणणं आहे. पीओपीच्या मूर्ती आकर्षक असल्या तरी पर्यावरणासाठी त्या धोकादायक आहेत. दरवर्षी अनेक सामाजिक संस्थांकडून पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला जातो. शाडू मातीच्या मूर्तीची मूर्ती खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. हळूहळू लोकांमध्ये हा संदेश रुजत चालला असून अनेक जण पर्यावरण पूरक मूर्तीला पसंती दिली जात आहे. शाडू मातीची मूर्ती पाण्यात सहज विरघळते. याशिवाय हानिकारक रसायन नसल्याने जलचर प्राण्यांना कुठलाच धोका नसतो.
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...
