Gangapur Dam : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग; नाशिकच्या रामकुंड परिसरात पूरस्थिती
नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून सध्या 5 हजार 186 इतका पाण्याचा विसर्ग गोदापात्रामध्ये सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी, गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून, सध्या 5 हजार 186 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे, आणि आसपासच्या भागातही पुराचे पाणी शिरले आहे.
मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पूर मोजण्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले आहे. रामकुंड परिसर पूर्णपणे जलमग्न झाला असून, भाजीपटांगणातही पुराचे पाणी घुसले आहे. गंगापूर धरणातून सकाळी 10 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

भास्कर जाधवांवर का आली सभागृहात वारंवार माफी मागण्याची वेळ?

आव्हाडांच्या मुलीला पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या अन्..

राड्यानंतर मविआचे नेते राज्यपालांच्या भेटीला

त्यापेक्षा माझा पोलिसांनी एन्काऊंटर करावा, ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या
