Kirit Somaiya | कराड स्थानकावर उतरुन किरीट सोमय्या विश्रामगृहाकडे रवाना

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पोलिसांनी कराडमध्ये (Karad) उतरवलं. सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने (Mahalaxmi Express) कोल्हापूरला (Kolhapur) निघाले होते.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पोलिसांनी कराडमध्ये (Karad) उतरवलं. सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने (Mahalaxmi Express) कोल्हापूरला (Kolhapur) निघाले होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमय्यांना पहाटे कराडमध्ये उतरवलं. आता सोमय्या कराड शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.

दुसरीकडे किरीट सोमय्यांच्या या पवित्र्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे सुद्धा आक्रमक झाले आहेत. त्यांनीही माध्यमांशी संवाद साधून आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला. हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. इतकंच नाही तर सोमय्यांविरुद्ध दुसरा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला. किरीट सोमय्यांनी दुसरा 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला, त्यानंतर आता आपण 50 कोटींचा दावा ठोकणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI