कसब्याचे ‘किंगमेकर’ गिरीश बापट यांचं निधन; वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Girish Bapat Passed Away : कसब्याचे 'किंगमेकर' गिरीश बापट काळाच्या पडद्याआड; अवघं पुणे शहर हळहळलं...
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या त्यांनी अखेरचा श्वास वर्षी घेतलाय. मागच्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. पुण्यातील दीनानाथ रुग्णालय त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. सर्वपक्षीय नेत्यांनी बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. पुण्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. कसबा मतदारसंघातील लोकांच्या मनात बापट यांचं अढळस्थान आहे.
Published on: Mar 29, 2023 12:33 PM
Latest Videos
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

