Video : मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर अन्याय नाही- गिरीश महाजन
गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. गुलाबराव पाटील आणि मी स्वतः ओबीसी आहोत. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर (obc) अन्याय केला हा एकनाथ खडसेंचा आरोप चुकीचा आहे. तुम्ही म्हणजे सगळे ओबीसी असं समजण्याचं कारण नाही. आपण थोडं शांत रहा. तू तू मै मै करू नका, […]
गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. गुलाबराव पाटील आणि मी स्वतः ओबीसी आहोत. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर (obc) अन्याय केला हा एकनाथ खडसेंचा आरोप चुकीचा आहे. तुम्ही म्हणजे सगळे ओबीसी असं समजण्याचं कारण नाही. आपण थोडं शांत रहा. तू तू मै मै करू नका, असा इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिला आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते. एकनाथ खडसे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर टीका केली होती. शिंदे-फडणवीस सरकारने विस्तारात ओबीसींवर अन्याय केल्याचा आरोप खडसे यांनी केला होता.
Follow Us
Latest Videos
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान

