AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव कडाडले, सोने पुन्हा ८० हजाराच्या पार

ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव कडाडले, सोने पुन्हा ८० हजाराच्या पार

| Updated on: Jan 18, 2025 | 3:28 PM
Share

सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ होत सोन्याचे दर तोळ्यामागे ८० हजाराच्या पुढे गेले आहेत. यामुळे लग्नसराईसाठी सोने खरेदीच्या बेतात असलेल्या नागरिकांना सोन्याच्या चढ्या दराचा सामना करावा लागणार आहे.

एकीकडे लग्नाच्या मुहूर्त सुरु असतानाच सोन्याची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या जळगावात सोन्याचे दर पुन्हा ८० हजाराच्या पार गेले आहेत. त्यामुळे लग्नसराईसाठी सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांचा खिशालाल हा फार सोसावा लागणार आहे. चार महिन्यांपूर्वी सोन्याचे दर ८० हजाराच्या पुढे गेले होते. त्यानंतर पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली होती. आता पुन्हा आंतरराष्ट्रीय बाजारातील उसळीमुळे सोन्याच्या दर जळगावात ८२ हजार तोळे इतके झाला आहे. तर चांदीच्या दरातही वाढ झाली असून चांदी देखील ९५  हजाराच्या पुढे गेली आहे. त्यामुळे सोने खरेदी महागली आहे. गेल्या ४८ तासांत सोन्याच्या दरात २ हजार ७०० तर चांदीचे दर ३ हजार ७०० रुपयांनी वाढले आहेत. हा दर आठवडाभर तरी काय राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे हे घडले आहे. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) या संघटनेने सोन्याचा भाव जाहीर करण्यासाठी एक व्हाट्सअप नंबर जाहीर केला आहे. केंद्र सरकाच्या सुट्या आणि शनिवार – रविवार शिवाय इतर कामकाजाच्या दिवशी या ८९५५६६४४३३ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास सोन्याचा ताजा दर कळणार आहे. प्रत्येक शहरानुसार या दरात स्थानिक कर आणि इतर जीएसटी वगैरे पकडून दरात थोडीफार तफावत असणार आहे.

Published on: Jan 18, 2025 03:28 PM