AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | यूपीत सभा... महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापणार?

Special Report | यूपीत सभा… महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापणार?

| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 9:49 PM
Share

उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या निमित्ताने जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याची पूर्ण तयारी ओवेसी महाशयांनी केलेली दिसते. दोन दिवसांपूर्वी ओवेसी हे प्रयागराजवरून लखनौला जात असताना वाटेत त्यांचे समर्थक जमले व त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे लावले, असा घणाघात सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलाय. त्यावरुन उद्धव सेनेचे 56 आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले आहेत. हे कदाचित जनाब संजय राऊत विसरले असतील, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत काय काय पाहावे लागेल, घडवले जाईल ते सांगता येत नाही. भारतीय जनता पक्षाच्या यशस्वी वाटचालीचे पडद्यामागचे सूत्रधार मियाँ असदुद्दीन ओवेसी व त्यांचा पक्ष चांगलाच कामाला लागल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या निमित्ताने जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याची पूर्ण तयारी ओवेसी महाशयांनी केलेली दिसते. दोन दिवसांपूर्वी ओवेसी हे प्रयागराजवरून लखनौला जात असताना वाटेत त्यांचे समर्थक जमले व त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे लावले, असा घणाघात सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलाय. त्यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांवर जोरदार पलटवार केलाय.

उद्धव सेनेचे 56 आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले आहेत. हे कदाचित जनाब संजय राऊत विसरले असतील, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला. योगींनी मुख्यमंत्री बनू नये म्हणून शपथा घेणाऱ्यांना योगीजी बघून घेतील. ते सक्षम आहेत. पण महाराष्ट्रातील हिंदूना शिव्या देणारा शर्जील उस्मानीसारख्या व्यक्तीवर तुम्हाला कारवाई करण्याची हिंमत नाही. अशा भेकड प्रवृत्तींनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही, असा टोलाही पडळकरांनी लगावलाय.

महाआघाडीचे मदारी डमरू वाजवतात आणि तुम्ही त्यांना खुश करण्यासाठी कोलांट्या उड्या मारता हे रोजचं मनोरंजन बंद करा. आता महाराष्ट्रातील जनतेला या खेळाची किळस आलीये, अशी घणाघाती टीका पडळकर यांनी केलीय.