एलआयसीच्या आयपीओबाबत लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता, केंद्र सरकारच्या जोरदार हालचाली

LIC IPO | सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकार IPO च्या माध्यमातून 60-75 हजार कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. आयपीओनंतर कंपनीचे मूल्यांकन 10 लाख कोटी रुपये होऊ शकते.

| Updated on: Oct 12, 2021 | 2:07 PM

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC – भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या IPO बाबत लवकरच मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर यासाठी सध्या जोरदार हालचाली सुरु आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच यासाठीचा DHRP दाखल होऊ शकतो. त्याची मुदत सरकारने जानेवारी 2022 पर्यंत निश्चित केली आहे. केंद्र सरकार मार्च 2022 पर्यंत आयपीओ आणण्याची योजना आखत आहे.

एलआयसीच्या आयपीओच्या व्यवस्थापनासाठी सरकारने 10 मर्चंट बँकर्सची नियुक्ती केली आहे. एलआयसीच्या आयपीओच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवलेल्या बँकर्समध्ये गोल्डमॅन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी अँड सिक्युरिटीज, एक्सिस कॅपिटल, बोफा सिक्युरिटीज, जेपी मॉर्गन इंडिया, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेडचा समावेश आहे.

केंद्र सरकार किती निधी उभारणार?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकार IPO च्या माध्यमातून 60-75 हजार कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. आयपीओनंतर कंपनीचे मूल्यांकन 10 लाख कोटी रुपये होऊ शकते.

सरकारने आपल्या विविध मालमत्तांमध्ये 1.75 लाख कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. एलआयसीचा आयपीओ हासुद्धा त्याच निर्गुंतवणुकीचा एक भाग आहे. आणि एलआयसीमध्ये निर्गुंतवणुकीशिवाय हे लक्ष्य पूर्ण होऊ शकत नाही. हा भारताचा सर्वात मोठा आयपीओ असेल. संपूर्ण देशाच्या गुंतवणूकदारांच्या नजरा त्याच्यावर असतील.

एलआयसीच्या पॉलिसीधारकांना आयपीओ बाजारपेठेत येईल तेव्हा झुकते माप मिळेल. कारण, 10 टक्के शेअर्स पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवण्यात येतील, असे केंद्राने यापूर्वीच जाहीर केले आहे. हा आयपीओ बाजारपेठेत आल्यानंतरही एलआयसीमधील सर्वाधिक भागीदारी ही केंद्र सरकारकडेच असेल.

एलआयसीची मालमत्ता 32 लाख कोटींची

एलआयसीच्या वार्षिक अहवालानुसार, सन 2019-20 या आर्थिक वर्षात एलआयसीची एकूण मालमत्ता जवळपास 32 लाख कोटी रुपये म्हणजेच 439 अब्ज डॉलर इतकी होती. जीवन विमा बाजारात एलआयसीचा वाटा सुमारे 69 टक्के आहे.

एलआयसी चेअरमनचा कार्यकाळ वाढला

एलआयसी आयपीओपूर्वी केंद्र सरकारने आयुर्विमा महामंडळाच्या चेअरमनचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे केले आहे. यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळ (कर्मचारी) विनियम, 1960 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस एलआयसीचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) आणण्याचा प्रस्ताव आहे. 30 जून 2021 रोजी सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नियमांमध्ये करण्यात आलेल्या बदलांना भारतीय जीवन विमा महामंडळ (कर्मचारी) दुरुस्ती नियम असे म्हणतात. एकूणच सरकार पातळीवर सुरु असलेल्या घडामोडी विचारात घेता एलआयसीचा आयपीओ वेळीच बाजारात लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे.

संबंधित बातम्या: 

एलआयसीचा आयपीओ आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली; याच महिन्यात मर्चंट बॅंकर्सकडून मागवणार निविदा

LIC IPO: ‘या’ महिन्यात मोठा निर्णय होण्याची शक्यता, लिस्टिंगनंतर कंपनी यादीत रिलायन्सला टाकेल मागे

मोदी सरकार LIC बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.