Chandrakant Patil | सरकारचे दहा हजार कोटींचे पॅकेज फसवे, चंद्रकांत पाटलांचा आरोप

अतिवृष्टी आणि पूरग्रस्तबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलं आहे. दरम्यान, सरकारचे दहा हजार कोटींचे पॅकेज फसवे असल्याचा आरोप भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

राज्यात यावर्षी अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. शेती आणि पिकांचं नुकसान बघून अनेक शेतकऱ्यांनी हंबरडा फोडला. अनेकांनी राज्य सरकारकडे मदतीची विनंती केली. अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ही विनंती राज्य सरकारने स्वीकारली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलं आहे. दरम्यान, सरकारचे दहा हजार कोटींचे पॅकेज फसवे असल्याचा आरोप भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI