AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grampanchayat Election : ग्रामपंचायतीचा धुरळा, नागपुरात ३६१ गावांचा कारभारी कोण होणार?

Grampanchayat Election : ग्रामपंचायतीचा धुरळा, नागपुरात ३६१ गावांचा कारभारी कोण होणार?

| Updated on: Nov 04, 2023 | 4:12 PM
Share

नागपूर जिल्ह्यात उद्या ३६१ ग्रामपंचायतसाठी मतदान होणार. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच परवा या ३६१ गावांचा कारभारी कोण असेल याचा फैसला होणार याचीच तयारी सध्या सुरू. मतपेट्या घेऊन कर्मचारी मतदान केंद्रांकडे निघाले असून चोख पोलीस सुरक्षेत मतपेट्या मतदान केंद्राकडे रवाना

नागपूर, ४ नोव्हेंबर २०२३ | नागपूर जिल्ह्यात उद्या ३६१ ग्रामपंचायतसाठी मतदान होणार आहे. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच परवा या ३६१ गावांचा कारभारी कोण असेल याचा फैसला होणार आहे. याचीच तयारी सध्या सुरू झाली आहे. मतपेट्या घेऊन कर्मचारी मतदान केंद्रांकडे निघाले असून चोख पोलीस सुरक्षेत मतपेट्या मतदान केंद्राकडे रवाना करण्यात येत आहे. उद्या रविवारी नागपुरात ग्रामपंचायतीचा धुरळा उडणार असून उद्याच मतदान होणार आहे. नागपुरात यंदा सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार असून ३६१ सरपंचपदांसाठी १ हजार १८६ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तसेच २ हजार ९९९ ग्रामपंचायत सदस्यांसाठी ६ हजार ८८२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. काल प्रचाराच्या अंतिम दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी शक्ती पणाला लावली होती. जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची सत्ता असल्याने भाजप पुढे मोठे आव्हान आहे.

Published on: Nov 04, 2023 04:09 PM