Mumbai Crime News : त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीला जंगलात फेकलं, नराधम नातवाश तिघांना अटक
Mumbai News : त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वतःच्याच आजीला नराधम नातवासह तिघांना पोलिसांनी अटक केलेली आहे.
त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वतःच्याच आजीला नराधम नातवाने आरे मधल्या जंगलात असलेल्या कचऱ्यात फेकल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. 22 तारखेला पोलिसांना ही आजी त्याठिकाणी आढळून आल्यानंतर त्यांना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या आजीच्या नातवाचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. आता या नातवाला अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत आजीचा दीर आणि आणखी एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी रात्री 3:30 वाजता 70 वर्षीय वयोवृद्ध आजीला नातवाने त्याच्या आजीला आरेच्या जंगलात फेकले होते. त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वतःच्या आजीला आरेच्या जंगलात फेकून जाणाऱ्या नातवाला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून गुंगारा देणाऱ्या नातवावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. दरम्यान, यशोदा गायकवाड असे या वृद्ध महिलेचे नाव असून तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर नातवावर करण्यात आलेले सर्व आरोप त्याने फेटाळले आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

