उद्धव ठाकरे यांच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, ठाकरे गटाचे इतर नेतेही हजर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67 वा महानिर्वाण दिन आहे. या दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटाचे इतर नेतेही महामानवाला अभिवादन करण्यासाठी उपस्थित
मुंबई, ६ डिसेंबर २०२३ : घटनेचे शिल्पकार, उपेक्षितांचे उद्धारक, वर्णभेदाचे विरोधक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67 वा महानिर्वाण दिन आहे. या दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटाचे इतर नेतेही महामानवाला अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. आज दादरच्या चैत्यभूमीवर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राज्यपाल देखील बाबासाहेबांना अभिवादन केले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील अभिवादन केल्याचे पाहायला मिळाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त्याने आंबेडकर अनुयायांची एकच गर्दी काल रात्रीपासूनच चैत्यभुमीवर उसळल्याचे पाहायला मिळत आहे. यासोबतच अनेक राजकीय नेते मंडळी देखील या चैत्यभूमीवर दाखल होत बाबासाहेब यांनी अभिवादन करताना दिसताय.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

