मुलाच्या लग्नात मंत्री गुलाबराव पाटलांनी धरला ठेका, जळगावात आज आणखी एक जंगी विवाहसोहळा!

राज्यात शिवसेने नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुलीच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच जळगावातील आणखी एका बड्या प्रस्थाच्या घरी विवाह सोहळा संपन्न होत आहे.

मुंबई :  राज्यात शिवसेने नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुलीच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच जळगावातील आणखी एका बड्या प्रस्थाच्या घरी विवाह सोहळा संपन्न होत आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil)  यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम (Vikram) यांचा आज विवाह सोहळा पार पडत आहे. चोपडा तालुक्यातील सनफुले गावातील भगवान भिका पाटील यांची कन्या प्रेरणा हिच्यासोबत हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव यांनी अहिराणी भाषेतील गाण्यावर ठेका धरला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI