उद्धवसाहेब बिना लायसन्सचे ड्रायव्हर, अजित पवार कंडक्टर, थोरात प्रवासी, गुलाबरावांची पंढरपुरात फटकेबाजी

राज्यातील माहाविकात आघाडीचे सरकार कधीही कोसळू शकते असा दावा भाजपकडून केला जातो. तर दुसरीकडे आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असं सत्ताधारी सांगत असतात. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली.

मुंबई : राज्यातील माहाविकात आघाडीचे सरकार कधीही कोसळू शकते असा दावा भाजपकडून केला जातो. तर दुसरीकडे आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असं सत्ताधारी सांगत असतात. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधकांवर टीका केली आहे. सरकार काहीही केलं तर कोसळणार नाही हे सांगण्यासाठी त्यांनी गाडी, ड्रायव्हर, कंटडक्टर आणि प्रवाशी असा दाखला देत विरोधकांची खिल्ली उडवली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI