Gunaratna Sadavarte : सयाजी शिंदे पाणी कम चाय, साधू संताचा अपमान केला तर… गुणरत्न सदावर्ते यांचा थेट इशारा
गुणरत्न सदावर्ते यांनी सयाजी शिंदे यांच्या वृक्षतोडीच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. नागपूर खंडपीठाच्या निकालानुसार वृक्षतोड नव्हे, तर वृक्षांचे रिप्लांटेशन आणि अधिकची लागवड होत असल्याचे सदावर्ते यांनी स्पष्ट केले. त्यांनी साधुसंतांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला.
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. सदावर्ते यांनी शिंदे यांच्या वृक्षतोड संदर्भातील वक्तव्यांना राजकीय प्रेरित ठरवत, ती वस्तुस्थिती नसून केवळ रिप्लांटेशन असल्याचे स्पष्ट केले. भारतीय संविधानाचा हवाला देत, नागपूर खंडपीठाच्या निर्णयानुसार अधिकची वृक्षलागवड केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे सदावर्ते यांनी सयाजी शिंदे यांच्या वक्तव्यांना पाणी कम चाय असे संबोधत, त्यांना यापुढे साधुसंतांचा अपमान न करण्याचा आणि खोटे नरेटिव्ह तयार न करण्याचा खबरदार म्हणत इशारा दिला आहे. राजकीय लाभासाठी असे वक्तव्ये करत राहिल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला. तर मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्याचे कौतुक करत, सदावर्ते यांनी शिंदे यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आणि राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन अशी वक्तव्ये करणे थांबवण्याचे आवाहन केले.
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

