“औरंगजेब..? छे छे छे…शी शी शी…”, प्रकाश आंबेडकरांच्या कृतीवर गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी औरंजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. आंबेडकर यांच्या या कृतीवर राजकीय वर्तुळातून टीका होत आहे.तर आंबेडकरांच्या या कृतीमुळे उद्धव ठाकरे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. दरम्यान या वादात वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी औरंजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. आंबेडकर यांच्या या कृतीवर राजकीय वर्तुळातून टीका होत आहे.तर आंबेडकरांच्या या कृतीमुळे उद्धव ठाकरे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. दरम्यान या वादात वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांचे वारसदार औरंगजेबाला थारा देऊ शकत नाही. प्रकाश आंबेडकर धर्मावर राजकारण करत नाहीत, पण प्रत्येकाने स्वतःत बदल केला पाहिजे. अल्पसंख्याक समाजातील मते बाळासाहेबांना कधीही मिळत नव्हती. पण बाळासाहेबांच्या डोक्यात काय चाललंय कळत नाही. त्यांचा एमआयएमचा फॉर्म्युला फेल गेला होता. त्यामुळे आता काहीही होणार नाही. प्रकाश आंबेडकर यांना अल्पसंख्याक समाजाचा काहीही फायदा होणार नाही. जयचंद पेक्षा म्होरक्या महत्त्वाचा असतो. प्रकाश आंबेडकर वकील आहेत ते आपली थिअरी लादतात. औरंगजेब हा पर्याय होऊच शकत नाही. औरंगजेब..? छे छे छे छे छे छे छे छे छे छे छे छे… शी शी शी… छे छे”, असं ते म्हणाले.राजकारणासाठी उद्धव ठाकरे फिट नाहीत. प्रकाश आंबेडकर हे राजकारणासाठी कधीही कुणाची वकिली करत नव्हते, इस बदलाव को क्या कहेंगे? हा हा हा हा हा हा हा”, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

