Gunratna Sadavarte यांना 13 April पर्यंत पोलीस कोठडी
सदावर्ते यांच्यावर हल्लेखोरांना चिथावणी दिल्याचा आणि हल्ल्याचं षडयंत्र रचण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, सदावर्ते यांना एका प्रकरणात ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलीस आले होते. मात्र, सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ झाल्याने सातारा पोलिसांना त्यांचा ताबा मिळू शकला नाही.
मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या निवासस्थावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्या प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांना आजही दिलासा मिळू शकला नाही. दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सदावर्ते यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. सदावर्ते यांच्या जामिनावर कोर्टात तब्बल तीन तास युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर आज अखेर सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसाची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे. सदावर्ते यांच्यावर हल्लेखोरांना चिथावणी दिल्याचा आणि हल्ल्याचं षडयंत्र रचण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, सदावर्ते यांना एका प्रकरणात ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलीस आले होते. मात्र, सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ झाल्याने सातारा पोलिसांना त्यांचा ताबा मिळू शकला नाही.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
