ज्ञानवापी मशिदीवरुन देशातील सामाजिक आणि धार्मिक वातावरण ढवळून निघालं आहे. त्यामुळे आता अनेक वाद उफाळून येत आहेत. ज्ञानवापी मशिदीमध्ये तलाव, खोल्या, तळघर आणि बऱ्याच गोष्टीवरुन आता वाद होऊ लागले आहेत. त्यामुळे हिंदू पक्षाच्या मते तलावाच्या आत शिवलिंग आहे तर हा मुद्दा मुस्लिम पक्षाला मान्य नाही. तर हिंदू पक्ष म्हणतो जी तीन फुटाची आकृती मिळाली आहे हीच शिवलिंग आहे तर मुस्लिम पक्ष म्हणतो ते कारंजा आहे. तर शिवलिंगाची वरील बाजू संगमरवरानं जोडला गेला आहे, तर मुस्लिम पक्षाकडून हे नाकारण्यात आले आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी नव्याने उफाळून येण्याची शंका आहे.