Beed Walmik Karad | वाल्मिक कराडची प्रकृती खालावली; अंबाजोगाईला हलवण्याच्या हालचाली सुरु, चर्चांना उधाण
बीड जिल्ह्यातील गाजलेल्या संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. सध्या बीड मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कराडवर कारागृहातच प्राथमिक उपचार सुरू असून, त्याला सलाईन लावण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराड याला मूत्राशयाचा संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
बीड जिल्ह्यातील गाजलेल्या संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. सध्या बीड मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कराडवर कारागृहातच प्राथमिक उपचार सुरू असून, त्याला सलाईन लावण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराड याला मूत्राशयाचा संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. ‘युरोसिस्टायटिस’ या आजारामुळे त्याला लघवीच्या जागी त्रास होत असून गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली असून पुढील उपचारासाठी त्याला अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडला अटक करण्यात आली होती. यापूर्वीही त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. आता पुन्हा त्याची प्रकृती बिघडल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
Published on: May 20, 2026 10:17 AM
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का

