AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon Rain | चाळीसगावात मुसळधार पाऊस, घरं-दुकानं पाण्याखाली

Jalgaon Rain | चाळीसगावात मुसळधार पाऊस, घरं-दुकानं पाण्याखाली

| Edited By: | Updated on: Aug 31, 2021 | 8:34 AM
Share

जळगावच्या चाळीसगावमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे येथील रस्ते, घरं आणि दुकानं पाण्याखाली गेली आहेत. कोदगाव आणि वलथाण ही धरणं भरली आहे. तसेच नद्यांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. रस्त्यावरील कार पाण्याखाली बुडाल्या आहेत. चाळीसगाव- अहमदनगर हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

ज्यात पावसाचा जोर वाढलाय. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी सोमवारी (30 ऑगस्ट) रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. मुंबईत तर सकाळपासून जोरदार सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 3-4 दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. काही ठिकाणी तर अतीमुसळधार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. या पावसाने औरंगाबादमध्ये पाझर तलाव फुटल्याची घटना घडलीय

मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पुढील 3-4 तास पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.