Hemangi Kavi Interview | बाई, बुब्स आणि ब्रा विषयावर हेमांगी कवीची मुलाखत, नेमकं काय म्हणाली ?
प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ (Hemangi Kavi) सध्या तिच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळने (Hemangi Kavi) ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ फेसबुकवर पोस्ट केल्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर धुमाकूळ उडाला आहे. हेमांगीच्या या पोस्टनंतर अनेकांनी मोकळेपणाने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यानंतरा आता याच विषयाला घेऊन हेमांगीने TV9मराठीशी बातचित केली आहे.
हेमांगी कवी काय म्हणाली?
आम्ही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहोत. अनेक वेळा आम्हाला ट्रोल केलं जातं, आम्ही सोशल मीडियावर कसं यावं, कसं बाहेर पडायवं हे आता समाज ठरवणार का? मी विदाऊट मेकअप गलिच्छ दिसते, असं देखील मला म्हटलं जातं. माझा सोशल मीडिया आहे, मला ठरवू द्या, मी कसं समोर यायचं. मेकअप करणे, अभिनय करणे हा माझा जॉब आहे. तो माझ्या कामाचा भाग आहे. पण मी माणूस आहे, मला प्रेशराईज केलं जातं, असं हेमांगी म्हणाली.
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.

