मोठी घडामोड! सचिन अहिर पहिला बॉम्ब… आता अजून स्फोट होणार; हिंदुस्थानी भाऊचा मोठा राजकीय दावा
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, बिग बॉस फेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर हिंदुस्थानी भाऊ याने ठाकरे गटाबाबत मोठा दावा केला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, बिग बॉस फेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर हिंदुस्थानी भाऊ याने ठाकरे गटाबाबत मोठा दावा केला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हिंदुस्थानी भाऊ यांनी, “७ सप्टेंबरपर्यंत ठाकरे गटाचे आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडतील,” असा दावा केला. तसेच त्यांनी “तोडाफोडीचं ऑपरेशन करणाऱ्यांनी आता स्वतःला सांभाळावं,” असा अप्रत्यक्ष इशाराही दिला. यावेळी त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. “मी आधीच सांगितलं होतं, १५ आमदार आणि २५ नगरसेवक जाण्याच्या मार्गावर आहेत. सचिन अहिर हा पहिला बॉम्ब होता,” असा दावा हिंदुस्थानी भाऊ यांनी केला.
पुढे बोलताना त्यांनी, “७ सप्टेंबरपर्यंत अजून खूप काही घडणार आहे,” असे सूचक वक्तव्य करत आगामी काळात आणखी राजकीय घडामोडी होण्याचे संकेत दिले.
दरम्यान, हिंदुस्थानी भाऊ यांच्या या दाव्यांवर ठाकरे गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, येत्या काही दिवसांत या दाव्यांवर कोणते राजकीय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 08, 2026 01:35 PM
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट

