Maharashtra Guidelines | हॉटेल्स, रेस्टॉरंट्स रात्री 12 पर्यत सुरु होणार , नवी नियमावली जाहीर

मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल करण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालये तसेच विद्यापीठे सुरु करण्याची सरकारने यापूर्वीच परवानगी दिली आहे. आता हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यांना सुरु ठेवण्याची वेळ सरकारने वाढवली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल करण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालये तसेच विद्यापीठे सुरु करण्याची सरकारने यापूर्वीच परवानगी दिली आहे. आता हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यांना सुरु ठेवण्याची वेळ सरकारने वाढवली आहे. राज्यातील सर्व उपहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व प्रकारची दुकाने रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने मान्यता दिलीय. यासंदर्भातील कार्यपद्धती आणि नियमावली सरकारने जाहीर केली आहे.

सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे सरकारने निर्बंध शिथीलकरणाचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सरकारने राज्यातील सर्व उपहारगृहे तसेच हॉटेल्स रात्री बारा वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. तसेच इतर दुकाने रात्री अकरा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे व्यापरी तसेच सेवा क्षेत्राला पुन्हा एकदा उभारी मिळण्यास मदत होणार आहे. सर्वांनी या नव्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI