मी शिवसेनाच म्हणणार, निवडणूक आयोगाच निर्णय मान्य नाही – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकर यांनी खेडमधील जाहीर सभेत पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर टीका केली. निवडणूक आयोग गुलाम म्हणून काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई : उद्धव ठाकरे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटापासून, भाजप, निवडणूक आयोग आणि माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, लहानपणापासून मी शिवसेनाप्रमुखांच्या सभा पाहत मोठा झालोय.प आज मी तुमच्या सर्व देव माणसांचा आशिर्वाद घेण्यासाठी आलोय. माझे आज हात रिकामे आहेत. तरी तुम्ही आला आहात. मी तुमच्याकडे मागायला आलो आहे. तुमचा आशिर्वाद मागायला आलोय. जे चोर आहेत त्यांना सांगायचंय. शिवसेना नाव चोरु शकतात पण शिवसेना चोरु शकत नाही. मला निवडणूक आयोगाला सांगायचंय मोती बिंदू झाला नसेल तर शिवसेना बघायला या. निवडणूक आयुक्त हे गुलाम आहेत. शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना सांगतोय. तुम्ही मराठी आणि हिंदूंच्या एकजुटीवर घाव घालत आहात.’
‘मी शिवसेनाच म्हणणार.निवडणूक आयोगाच निर्णय मान्य नाही. भाजपला कुत्र पण विचारत नव्हतं. शिवसेनाप्रमुखांनी विचारलं नसतं तर कुठे असता. ढेकणं अशीच चिरडायची असतात. त्यासाठी गोळीबार करण्याची गरज नाही. ज्यांना कुटुंबिय मानलं त्यांनीच आईवर वार केला. शिवसेना आमची आई आहे. शिवसेना नसती तर आम्ही कोण होतो.’
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

