Rajasthan : राजस्थानच्या चुरूत भारतीय वायुसेनेचे विमान कोसळले, एकाचा मृत्यू
भानूदा गावात आज भारतीय वायुसेनेचे एक विमान कोसळल्याने भीषण अपघात घडला.
राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील रतनगड परिसरातील भानूदा गावात आज भारतीय वायुसेनेचे एक विमान कोसळल्याने भीषण अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अपघातस्थळी एक मृतदेह आढळून आला असून, तो विमानाच्या वैमानिकाचा असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिक ग्रामस्थांनी विमान खाली कोसळताना पाहिले आणि तातडीने पोलिस व प्रशासनाला माहिती दिली.
घटनेनंतर अवघ्या काही वेळात पोलिस आणि वायुसेनेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचाव तसेच शोधकार्य सुरू केले. विमानाचा मलबा सुमारे 200 फूट परिसरात पसरलेला आढळला असून, त्याचे तुकडे दूरवर विखुरले गेले आहेत. विमानात फक्त वैमानिक होते की इतर कोणीही होते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

