Navneet Rana On Uddhav Thackeray | मुन्नाभाई सुपरहिट झाला तर तुमची वाट लागेल : नवनीत राणा-TV9

नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. पुन्हा एकदा नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यावर पलटवार केलेला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

May 15, 2022 | 1:20 PM

मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यावरुन शिवसेना विरुद्ध मनसे आणि भाजप असं चित्र पाहायला मिळत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याला घेतलेल्या सभेत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. राज यांच्या टीकेला शनिवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी केली. ‘चित्रपटाच्या शेवटी त्या मुन्नाभाईला कळतं की साला अपुनके भेजेमे केमिकल लोचा हुआ है. तर ही केमिकल लोचाची केस आहे’, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावर कालच्या सभेत केली. यावरच नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. स्वप्न ही खरी होत असतात. हे लक्षात ठेवा आणि हे स्वप्न खरं झालं तर तुम्ही फॉल्प होणार आहात. तुम्ही फॉल्प आहातच. अशी टीक नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें