Gopichand Padalkar | पवारांचा सल्ला घेतला तर महाराष्ट्राची माती होईल पडळकरांची पवारांवर टीका

पोलिसांच्या ताब्यात असताना केतकीवर हल्ले करता, का तर पोलीस तुमचे ऐकतात म्हणून? तसेच एका घटनेत एक गुन्हा दाखल झाला ठीक आहे, पण 13 गुन्हे कशासाठी दाखल करता? कायदेशीर कारवाई होऊ द्या पण तुम्ही हल्ले करताय ही कुठली पद्धत? जेव्ह जेव्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सत्ता येते तेव्हा तेव्हा सर्वसामान्य लोकांवर अन्याय होतो, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 18, 2022 | 9:33 PM

सोलापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar)यांनी पुन्हा एकदा रोहित पवार (Rohit Pawar)आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुण्यातल्या धक्काबुक्कीच्या प्रकरणावरून आता वार पलटवार सुरू झाले आहेत. रोहित पवारांच्या टीकेवर पलटवार करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, – कोण रोहित पवार? रोहित पवारांना जरा तरी लाज वाटली पाहिजे. तुमच्या कार्यकर्त्याने माझ्या गाडीवर दगड फेकला तर त्याचा सत्कार तुम्ही केलात आणि आम्हास संस्कृती सांगताय. तुम्ही महाराष्ट्राला संस्कृती शिकवू नका. तुम्ही जे पेरताय ते उगवते. तुमचा कार्यकर्ता शोधा आणि तोडा असे आदेश काढतो. तर सुप्रिया सुळेंवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्याने बलात्कार केला त्यावर कारवाई का नाही झाली? पूजा चव्हाण प्रकरणावेळी कुठे होत्या सुप्रिया सुळे? असे सवाल त्यांनी केले.

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें