Vaishnavi Hagawane Case : हगवणे माय-लेकाच्या अडचणी वाढल्या; फसवणुकीचा रचला होता कट
Vaishnavi Hagawane Case Updates : इंडसन बँकेने केलेल्या स्पष्टीकरणानंतर शशांक आणि लता हगवणेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
जेसीबीचा अनधिकृत ताबा प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे. अटक करण्यात आलेले हे तिघे इंडसन बँकेचे एजंट असल्याची माहिती समोर आली आहे. इंडसन बँकेचे अधिकारी असल्याचं भासवत जेसीबी ताब्यात घेतला होता. तसंच येळवंडे यांच्याकडून जेसीबी जप्त करणारे लोक हे हगवणे यांचे माणसं असल्याचं उघड झालं आहे. हगवणे माय-लेकाने कट रचल्याचं उघड झालं आहे. पोलिसांच्या तपासात ही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारे भामटे हे शशांक हगवणेची माणसं होती, ही शंका आता खरी ठरताना दिसत आहे. कारण जेसीबी विक्री फसवणुकीत इंडसन बँकेने मोठा खुलासा केला. तक्रारदार प्रशांत येळवंडे कडून आम्ही जेसीबी जप्त केलाच नाही, असा खुलासा बँकेने केला आहे. म्हाळुंगे पोलिसांनी काल बँकेच्या लीगल डिपार्टमेंटची चौकशी केली, त्यानंतर शशांक आणि लता हगवणेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Published on: Jun 05, 2025 02:25 PM
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
