मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टी, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टी, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश heavy rainfall Mumbai kokan

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टी, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 3:32 PM

मुंबई:  मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक 9 ते 12 जून या चार दिवसांच्या काळात  हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे. परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतांना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लोलाईन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.