Maharashtra Rain Update | येत्या ४८ तासात मॉन्सून होणार सक्रिय, राज्यात कुठं कोसळणार मुसळधार पाऊस?
VIDEO | राज्यातील काही जिल्ह्यात पुढील ४८ तासात मॉन्सून सक्रिय राहणार तर २५ आणि २६ सप्टेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागानं कोणत्या राज्यासाठी दिला इशारा?
पुणे, 23 सप्टेंबर 2023 | गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातले आहे. नागपूर, नाशिक, भंडारा आणि लातूर या जिल्ह्यात पावसानं हाहाःकार केला आहे. तर पुढील ४८ तासात राज्यभरात मॉन्सून सक्रिय राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. रायगड, भंडारा, गोंदिया, नागपूर, नाशिकमध्ये तुरळक ते मुसळधार ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील उर्वरित भागात मेघगर्जेनेसह मुसळधार पावसाची शक्यता देखील पुणे वेधशाळेतील ज्योती सोनार यांनी वर्तविली आहे. दरम्यान, पुण्यातील हवामान विभागाने राज्यातील पावसाचा अंदाज व्यक्त करताना येत्या २५ आणि २६ तारखेला राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचेही सांगितले आहे. तर गणेशोत्सव काळात छत्री घेऊनच बाहेर पडण्याचे आवाहन हवामान विभागाकडून राज्यभरातील नागरिकांना करण्यात येणार आहे.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!

