‘एकच मिशन जुनी पेन्शन’, सराकरी कर्मचाऱ्याची घोषणा अन् सरकारपुढे टेन्शन; बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
VIDEO | राज्यात अद्याप जुनी पेन्शनवर वाद-प्रतिवाद सुरू, सरकार सकारात्मक मात्र तातडीने निर्णय नाही... घा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : राज्यातील जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी. या प्रमुख मागणीसाठी हे सर्व सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहेत. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार आणि आंदोलक कर्मचारी यांच्यात आज बैठक झाली मात्र ही बैठक निष्फळ ठरल्याचे सांगितले जात आहे. सरकार सकारात्मक आहे मात्र तातडीने निर्णय होणार नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात अद्याप जुनी पेन्शनवर वाद-प्रतिवाद सुरू आहे. तुम्ही जुनी पेन्शन योजना लागू करणार आहात की नाही, ठोस हमी द्या, असे सरकारी कर्मचाऱ्यांचे म्हणणे असून उद्यापासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहे. बघा या संदर्भातील टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

