New Rules : गॅसचे दर, UPI पेमेंट अन्… आजपासून ‘हे’ 5 मोठे बदल…बघा तुमच्या फायद्याचे की खिशाला कात्री?
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही आर्थिक आणि इतर नियमांमध्ये बदल होणे सामान्य आहे. १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणारे काही महत्त्वाचे बदल खालीलप्रमाणे आहेत.
आजपासून अर्थात १ ऑगस्टपासून पाच मोठे आणि महत्त्वाचे बदल होणार आहेत. आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर ३४ रूपये ५० पैशांनी स्वस्त होणार आहे. ही दर कपात १९ किलोच्या सिलिंडरवर लागू असणार आहे. तर यूपीआय अॅप्लिकेशनवर बॅलेन्स चेक करण्यासाठी मर्यादा लागू करण्यात आली आहे. आता दिवसाला केवळ ५० वेळा बॅलेन्स चेक करता येणार आहे. तर आता ऑटो पे जसे की, ईएमआय, सबस्क्रिप्शन किंवा बिल पेमेंट ठराविक वेळेतच करता येणार आहे. यासह विमानात वापरलं जाणारं इंधन महागलं असल्याने विमान प्रवास आता महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमानप्रवास करणाऱ्यांच्या खिशला कात्री लागणार आहे. एसबीआयकडून काही को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्सवरील मोफत हवाई अपघात विमा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

