AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | आदित्य ठाकरे, अनिल परबांच्या जवळच्या व्यक्तींवर छापे -Tv9

Special Report | आदित्य ठाकरे, अनिल परबांच्या जवळच्या व्यक्तींवर छापे -Tv9

| Edited By: | Updated on: Mar 08, 2022 | 9:35 PM
Share

युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने (it department) धाड मारलेली असतानाच आता आणखी एका शिवसैनिकाच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला आहे.

मुंबई: युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने (it department) धाड मारलेली असतानाच आता आणखी एका शिवसैनिकाच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि शिवसैनिक संजय कदम यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारली आहे. सकाळपासूनच कदम यांच्या घरावर आयकर विभागाने धाडसत्रं सुरू केलं आहे. तसेच पुण्यातील आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावरही आयटीने छापा मारल्याची सूत्राची माहिती आहे. आयकर विभागाने एकाच दिवशी दोन शिवसेना नेत्यांच्या घरांवर छापेमारी केल्याने शिवसेनेचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तर, आयकर विभागाच्या धाडीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्रीय यंत्रणा भाजपच्या प्रचार यंत्रणा, महाराष्ट्र झुकणार नाही, थांबणार नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.