AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Alliance Morcha: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?

India Alliance Morcha: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?

| Updated on: Oct 06, 2026 | 2:23 PM
Share

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीने दिल्लीत भव्य मोर्चा काढला. राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि अनेक खासदारांनी आंदोलनात सहभाग घेतला. दिल्ली पोलिसांनी आंदोलक खासदारांना ताब्यात घेतले. आकाशवाणी भवन आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ जोरदार निदर्शने झाली.

दिल्लीत इंडिया आघाडीने ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. सकाळी साडेदहा वाजल्यापासून हे आंदोलन सुरू झाले. राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राऊत यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक खासदार या आंदोलनात सहभागी झाले होते. एकूण 19 पक्षांचे जवळपास 150 हून अधिक खासदार यात सामील झाले. आंदोलक खासदारांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास पोलिसांनी अनेक खासदारांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन बसमध्ये बसवले. मात्र, बसमधून खाली उतरल्यावर त्यांनी आकाशवाणी भवनाजवळ ठिय्या आंदोलन सुरू ठेवले. निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाण्यावर ते ठाम होते. जवळपास एक तासाहून अधिक काळ त्यांनी ठिय्या दिला. काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आत शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. पोलिसांनी खासदारांवर लाठीचार्ज केल्याचा आरोपही काही खासदारांनी केला आहे. लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांना आंदोलनाचा अधिकार नाही का, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

Published on: Oct 06, 2026 02:23 PM

Follow Us