मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं मोठं कारण काय?
देशातील वाढत्या साखर दरांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत साखर निर्यातीवर तात्काळ बंदी लागू केली आहे. देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही बंदी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश मानला जातो. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय साखर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेच्या वाढत्या किमती आणि देशांतर्गत उपलब्धता लक्षात घेऊन सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सरकारने स्पष्ट केले आहे की, ज्या साखर निर्यातीसंदर्भातील करारांवर यापूर्वीच स्वाक्षऱ्या झाल्या आहेत किंवा ज्या व्यवहारांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या करारांनुसार साखर निर्यात केली जाणार आहे. मात्र, यापुढे नवीन निर्यात करारांना परवानगी दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Published on: May 14, 2026 09:56 AM
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,