Jammu Kashmir Terrorist List : 14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 Wanted Terrorists India 2025 : एजन्सीने 14 कट्टर दहशतवाद्यांची यादी जाहीर केलेली आहे. एप्रिल 2025 पासून सक्रिय असलेल्या 14 कट्टर दहशतवाद्यांची ही यादी आहे.
एजन्सीने 14 कट्टर दहशतवाद्यांची यादी जाहीर केलेली आहे. एप्रिल 2025 पासून सक्रिय असलेल्या 14 कट्टर दहशतवाद्यांची ही यादी आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अॅक्शन मोडवर आलेल्या आहेत. दहशतवाद्यांची शोध मोहीम सध्या यंत्रणेने हाती घेतलेली आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील 14 सक्रिय दहशतवाद्यांच्या नाव आणि फोटोची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारकडून ही यादी जाहीर झालेली आहे.
यात लष्कर-ए-तोयबाचा सोपोर कमांडर आदिल रहमान देंतु हा 2021 पासून सक्रिय असून तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. आसिफ अहमद शेख हा जैश-ए-मोहम्मदचा अवंतीपुरा जिल्हा कमांडर असून 2022 पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे. एहसान अहमद शेख पुलवामामध्ये सक्रिय लष्कर दहशतवादी, 2023 पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय. यासह 14 कट्टर दहशतवाद्यांचे नाव आणि इतर माहिती असलेली यादी जाहीर करण्यात आली आहे.
Published on: Apr 27, 2025 12:53 PM
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
