AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunita Williams Video : सुनीता विल्यम्स यांची अखेर 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास

Sunita Williams Video : सुनीता विल्यम्स यांची अखेर ‘ग्रह’वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास

| Updated on: Mar 19, 2025 | 10:33 AM
Share

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स, निक हेग, बुच विल्मोर आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोरबुनोव्ह हे स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून यशस्वीरित्या पृथ्वीवर आज सुखरूपरित्या परतले

अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची आज पहाटे ग्रहवापसी झाली आहे. अवघ्या आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या होत्या मात्र तब्बल नऊ महिने भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अंतराळात अडकून पडल्या होत्या. आज पहाटे तीन वाजून २७ मिनिटांनी प्लोरिडाच्या किनारपट्टीवर अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचं यशस्वी लँडिंग झाले आहे. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे दोघेही ९ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले आहेत. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना घेऊन नासा आणि स्पेस एक्सचं कॅप्सुल भारतीय वेळेनुसार आज बुधवारी पहाटे तीन वाजून २७ मिनिटांनी पृथ्वीवर दाखल झाले आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळवीर 5 जून 2024 रोजी स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनकडे झेपावले होते. तिथे ८ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते. मात्र त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाला. त्यामुळे ते दोघेही तिथेच अडकून पडले होते. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर आज पहाटे सर्व अंतराळवीर भारतात सुखरुपपणे परतले आहेत.

Published on: Mar 19, 2025 10:24 AM