AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market : ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला

Share Market : ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला

| Updated on: Apr 07, 2025 | 10:51 AM
Share

Trump Tariff Impact India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात घसरण झालेली बघायला मिळाली आहे. कोरोनानंतर पहिल्यांदा इतक्या मोठ्याप्रमाणात शेअर बाजारात घसरण झाली आहे.

ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. सेन्सेक्स 3 हजार अंकांनी तर निफ्टीत 1 हजार अंकांची घसरण झाली आहे. निफ्टीची लोअर सर्किटच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आज शेअर बाजार उघडताच ही मोठी पडझड झाली आहे. कोरोनानंतर आज पहिल्यांदाच भारतीय शेअर बाजारात इतकी मोठी पडझड झाली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात आज चांगलाच हाहाकार माजलेला बघायला मिळत आहे. एकीकडे सेन्सेक्स 3 हजार अंकांनी पडला आहे. तर निफ्टी 1 हजार अंकांनी खाली आला. त्यामुळे शेअर बाजारात आज अभूतपूर्व अशी घसरण पाहायला मिळाली.  ही परिस्थिती कधी सुधरेल हे सध्या तरी सांगता येणं कठीण असल्याने गुंतवणूकदारांमध्ये सध्या घबराट पसरली आहे.

Published on: Apr 07, 2025 10:51 AM