Indrayani River Accident : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 20-25 जण वाहून गेल्याची भीती, 6 दगावले
Indrayani River Accident News : मावळ तालुक्यात इंद्रायणीवरील पूल वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात 6 जणांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.
पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्दैवी दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच या घटनेत तब्बल 20 ते 25 जण वाहून गेले असल्याचीही माहिती समोर आली आहे. वाहून गेलेल्या नागरिक पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य हे युद्धपातळीवर सुरू झालं आहे.
आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रविवार असल्याने मावळ तालुक्यातील कुंडमळा या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली होती. पावसाळा असल्याने या ठिकाणी रोज अनेक पर्यटक भेट देतात. कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. एकाचवेळी क्षमतेपेक्षा जास्त लोक या पुलावर उभे राहिल्याने हा पूल कोसळला असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे हा पूल कोसळला. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20-25 लोक वाहून गेले आहे.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

