Indurikar Maharaj : माझं जगणं मुश्कील… माणूस नालायक असावा पण किती? इंदुरीकर महाराज भर किर्तनात भडकले, बघा काय म्हणाले?
इंदुरीकर महाराजांनी मुलीच्या साखरपुड्यावरून झालेल्या ट्रोलिंगमुळे व्यथित होऊन लवकरच कीर्तन थांबवणार असल्याची खंत व्यक्त केली आहे. बघा काय म्हणाले इंदुरीकर महाराज
प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी जुन्नर येथील कीर्तनात आपली खंत व्यक्त केली आहे. मुलीच्या साखरपुड्यावरून सोशल मीडियावर ट्रोल केले जात असल्यामुळे इंदुरीकर महाराज व्यथित झाल्याचे पाहायला मिळाले. मुलीच्या साखरपुड्यातील कपड्यांच्या खरेदीवरून झालेल्या ट्रोलिंगवर इंदुरीकर महाराज यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि टीका करणाऱ्यांना लाज बाळगण्याचा सल्ला दिला.
सोशल मीडियावरून ट्रोलकरून टीका करणाऱ्यांना उत्तर देतांना इंदुरीकर महाराज म्हणाले, ‘मला एक सांगा तुम्हाला मुलगी आहे. तुमच्या मुलीच्या कपड्यांवर एखाद्याने कमेंट केली तुम्हाला काय वाटेल? मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवर देव वाले घेतात की मुलीकडचे घेतात? मग कपडे कोणी घेतले असतील. मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे नाही’, असे इंदूरीकर महाराज म्हणाले. इतकंच नाहीतर माणूस नालायक असावा पण किती असावा? असं म्हणत ट्रोलिंग करणाऱ्यांवर टीका केली.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा

