Special Report | पोटनिवडणुकीत भाजपला महागाईची झळ ?

कालच्या निकालात राजकीय प्रादेशीक पक्षपण आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरले आहेत. काँग्रेसने अपेक्षेपेक्षा चांगले प्रदर्शन केले, मात्र भाजपासाठी कालचे निकाल चिंता वाढवणारे ठरले.

नवी दिल्ली : देशातील 3 लोकसभा आणि 29 विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकींचा काल निकाल लागला. या निकालानंतर अनेक राजकीय संदेश मिळतात आणि जनतेचा कौल कुठे आहे त्याचा अंदाज येतोय. 2022 मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी आलेल्या या निकालानी राजकीय पक्षांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत. पोटनिवडणुकीत ज्या पक्षाची राज्यात सत्ता आहे त्यांना फायदा होण्याचा ट्रेंड दिसला. कालच्या निकालात राजकीय प्रादेशीक पक्षपण आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरले आहेत. काँग्रेसने अपेक्षेपेक्षा चांगले प्रदर्शन केले, मात्र भाजपासाठी कालचे निकाल चिंता वाढवणारे ठरले. हिमाचलमधील दणदणीत पराभव ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, तर काँग्रेससाठी 2022 च्या निवडणुकीपूर्वी ती प्रोत्साहनाची घंटा मानली जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI