Light Bill : एकीकडे अवकाळीने त्रस्त, दुसरीकडं वीज दर वाढीचा नाशिककरांना शॉक!
यामुळे वाढत्या उन्हाने सर्वसामान्य माणूस भाजून निघत असतानाच वीज दर वाढीने तो पुरता होरपळून निघत आहे. अशीच स्थिती सध्या नाशिकच्या मालेगावमध्ये पहायला मिळत आहे.
नाशिक : आधीच महागाई, अवकाळी पावसामुळे शेतकरी व त्यावर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचे हाल झाले आहेत. त्यातच आता महावितरणकडून देखिल नागरिकांना दर वाढीतून शॉक देण्याचे काम सुरू आहे. यामुळे वाढत्या उन्हाने सर्वसामान्य माणूस भाजून निघत असतानाच वीज दर वाढीने तो पुरता होरपळून निघत आहे. अशीच स्थिती सध्या नाशिकच्या मालेगावमध्ये पहायला मिळत आहे. येथे नागरिकांना वाढत्या वीज बिलाचा झटका बसला आहे. ज्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. 1 एप्रिल 2023 पासून विद्युत नियामक आयोगाने वीज दरात वाढ केली आहे. पहिल्या 100 युनिटपर्यंत एक रुपया पाच पैसे, तीनशे युनिटपर्यंत दोन रुपये तीस पैसे, पाचशे युनिटपर्यंत तीन रुपये चोवीस पैसे प्रतियुनिट, अशी वाढ केली आहे. यादरवाढीचा मालेगावकरांना फटका बसत आहे.
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट

