sleep apnea साठी कराडला ICU मध्ये ठेवायची काय गरज, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यात जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत.आज शनिवारी मुंबईत मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात आला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यभरात जनआक्रोश मोर्चे सुरु आहेत. मुंबईत देखील शनिवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आरोपी वाल्मीक कराड यांला फार काही मोठा आजार झालेला नाही. त्याला स्लीप एपनिया झालेला आहे. देशातील दहा टक्के लोकांना स्लीप एपनिया झालेला आहे. त्यामुळे त्याची सर्व मेडिकल कागदपत्रे जाहीर करावीत अशी मागणीही आव्हाड यांनी केली आहे. या प्रकरणात वाल्मीक कराड याला काही एवढे सिक्रेट आणि गुपितं माहिती आहेत की त्याला सर्व जण घाबरतात असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. दुसरीकडे आझाद मैदानात शनिवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला असून या मोर्च्यात संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आरोपींना लवकरात लवकर फाशी झाली पाहीजे अशी मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील वाल्मीक कराड याला आर्थर रोड तुरुंगात ठेवण्याची मागणी केली आहे.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

