साताऱ्यात थंडीचा कडाका वाढला, फळ बागांना मोठा फटका

सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरू लागला असल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे.

सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरू लागला असल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या हवामान बदलामुळे आलेल्या अवकाळी पावसाचे सावट सध्यातरी हटले आहे. दररोज हवामानात बदल होऊ लागले आहेत त्यामुळे दिवसभर कडक ऊन आणि रात्री गारठा पडू लागला आहे. सायंकाळी तापमानाचा पारा घसरत असून पहाटे धुक्यांची रस्त्यावर गर्दी केल्याने नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. या धुक्यामुळे ज्वारी सह, भाजीपाला, फळ फळबागांना पिकांना मात्र मोठा फटका बसणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI