Ravindra Dhangekar : महायुतीतच कुरघोड्या… धंगेकरांची आर या पारची भाषा, कितीही किंमत मोजावी लागली तरी…
पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहारावरून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात वाद पेटला आहे. धंगेकरांच्या आरोपांमुळे पुणे भाजपने त्यांच्याविरोधात तक्रार केली, तर शिंदेच्या शिवसेनेने गणेश नाईकांचा मुद्दा उपस्थित करत महायुतीतील कुरघोड्या उघड केल्या आहेत. या प्रकरणात विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून, भविष्यात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहारावरून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार रवींद्र धंगेकर यांच्यातील वाद चांगलाच तापला आहे. या प्रकरणावरून भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाल्याचे दिसत आहे. रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात आरपारची भूमिका घेत, कितीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी आपल्या एक्स प्रोफाइलवरून शिवसेनेचा लोगोही हटवला आहे.
धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करत, घोटाळ्यात दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. पुणे भाजपने धंगेकरांच्या या आरोपांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असून, महायुतीत मिठाचा खडा टाकल्याचा आरोप केला आहे. यावर उदय सामंत यांनी धंगेकरांवर कारवाई करायची झाल्यास, शिंदे सरकारवर टीका करणाऱ्या गणेश नाईकांचे काय, असा खोचक सवाल विचारत महायुतीतील नेत्यांमधील कुरघोड्या समोर आणल्या आहेत. संजय राऊत यांनीही धंगेकरांना सरकारमधीलच एका गटाचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण घेतले आहे.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

