Jalindra Supekar : सुपेकरांच्या अडचणी वाढणार, कैद्याला 500 कोटी मागितले; वकिलांचा गंभीर आरोप
New Allegations On Jalindar Supekar : विशेष महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावर कैद्याकडे 500 कोटी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जालिंदर सुपेकर यांच्यावर 500 कोटी रुपये मागितल्याचा आरोप आहे. अमरावतीमधील कैद्याच्या वकिलाने हा आरोप केला आहे. वकील निवृत्ती कराड यांचा सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप आहे. 2023 मध्ये अमरावती तुरुंग उपमहा निरीक्षक असताना सुपेकर यांनी पैसे मागितले असल्याचा आरोप वकीलांनी केला आहे. या आरोपमुळे सुपेकर यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
विशेष महानिरीक्षक जालिंदर सुपेकर हे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबाचे नातेवाईक आहेत. त्यांच्यावर हगवणे यांना अवैध पद्धतीने शस्त्र परवाना देणे आणि वैष्णवीच्या तक्रारीवर कारवाई करु नये, यासाठी पोलीस खात्याच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे सुपेकर यांना पदनावत करण्यात आलं.

फडणवीसांच्या कार्यक्रमात खडसे; म्हणाले, ते आले पण पदरात काहीच पडल नाही

स्मशानभूमीत नग्न दाम्पत्याकडून अघोरी पूजा, CCTVमध्ये जे दिसलं त्यानं..

पुणेकरांनो शहरातील हे 20 रस्ते 23 जूनपर्यंत वाहतुकीसाठी बंद, कारण काय?

झिंज्या उपटल्या, रक्तबंबाळ होईपर्यंत हाणामारी.. लोकलमधला VIDEO व्हायरल
