Jalna Crime : आरोपी नवनाथ दौंडचा मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल
Jalna Crime News Video : जालन्यातील चटके देऊन मारहाण प्रकरणातील आरोपी नवनाथ दौंड याचा आणखी एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
जालन्यातील चटके देऊन मारहाण प्रकरणातील आरोपी नवनाथ दौंड याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. पैशांच्या वादातून एका व्यक्तीच्या अंगावर कुऱ्हाड घेऊन धावून जातानाचा हा व्हिडिओ आहे. नवनाथ दौंड याच्या हातात लाठ्याकाठ्या देखील असल्याचं या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. दरम्यान, नवनाथ दौंड याने ठाकरे गटाच्या भोकरदन तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
जालन्यात एका व्यक्तीला क्षुल्लक कारणावरून पायाला चटके देत मारहाण करण्यात आलेली होती. या घटनेत शिवसेना उबाठा गटाचा भोकरदन तालुक्याचा अध्यक्ष नवनाथ दौंड हा आरोपी आहे. त्याचा आता मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे कारवाईची मागणी केली जात आहे.
Published on: Mar 07, 2025 06:59 PM
Latest Videos

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका

आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
