Jalna News : विजेचा धक्का लागून वडिलांसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत
वरुड गावामध्ये शेतात काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने एका इसमाचा आणि 2 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
जालना जिल्हातील वरुड गावामध्ये शेतात काम करत असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. शेतात काम करताना शेतातून गेलेल्या तुटलेल्या वायरला स्पर्श झाल्याने जोरदार झटका बसून वडिलांसह 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
जालना जिल्हातील वरुड गावामध्ये वडिलांसह 2 चिमुकल्यांच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे. सदर घटनेत विनोद तुकाराम मस्के यांच्यासह श्रद्धा म्हस्के आणि समर्थ मस्के या दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. दरम्यान वरुड शिवारातील शेतातमध्ये विनोद म्हस्के हे शेतात काम करत होते. शेतामध्ये मल्चिंग पेपर अंथरत असतानाच शेतातून विद्युत प्रवाह घेऊन जाणारे केबल कट झाल्याने विनोद म्हस्के यांना विजेचा धक्का बसला. यात ते जमिनीवर कोसळले. त्याच वेळी त्यांचे दोन्ही लहानगे त्यांच्या जवळ गेल्याने त्यांना देखील विजेचा धक्का लागला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

